खिर्डीसह परीसरात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

0

कापून ठेवलेल्या गव्हासह हरभरा, मका व टरबुजालाही मोठा फटका

खिर्डी : खिर्डीसह परीसरात बुधवार, 25 रोजी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी कापुन ठेवलेला गहु, हरभरा व मका या पिकांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. देशात कोरोनामुळे संचारबंदी असताना शेतात मजुर मिळणे कठीण झाले आहे. चारपेक्षा जास्त मजुर शेतात येत नसल्याने शेतीच्या कामांनाही ब्रेक बसला आहे त्यामुळे शेतात गहु, मका व हरभरा शेतकर्‍यांनी कापुन ठेवले असुन ते तयार करण्यासाठी गहु काढणी यंत्र मिळत नसल्याने शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे

टरबुजाचे मोठे नुकसान
सध्या मार्च महिन्यात टरबुजांना मागणी असते तर शेतात टरबुज तयार आहे मात्र राज्य व सीमा लॉक असल्यामुळे वाहने येत नसल्यामुळे मोठे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागत आहे त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या शेतीमालाला शिथीलता आणून वाहनांना सुट देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

केळीचे मोठे नुकसान
शेतकर्‍यांच्या केळी बागेत कापणीयोग्य केळी झाली आहे परंतु सध्या संपूर्ण देशासह भारतात संचारबंदी असल्यामुळे केळी ग्रुप सुद्धा बंद आहे त्यामुळे मालाची आयात-निर्यात बंद असल्यामुळे शेतकर्‍यांची केळी पडून राहील त्यामुळे केळी पिकल्यामुळे व्यापारी अशा केळीना घेत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने यावर शासनाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. शेतकर्‍यांनी मका, गहु व हरभरा कापून ठेवला असून अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे शेतीमालाला उचलण्यासाठी शासनाने उपाययोजना केली पाहिजे, असे खिर्डीचे शेतकरी डॉ.मुरलीधर पाटील म्हणाले.