खिर्डी खुर्द – बाजार पट्टा भागात बलवाडी रस्त्यालगत गवतावर तणनाशक फवारणी केल्यामुळे 10 ते 15 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. शनिवारी ग्राम पंचायतीकडून गवतावर तण नाशकाची फवारणी केली होती. गटारीतले पाणी पिल्याने तसेच जीव जंतुला कोंबड्यानी खाल्ल्यामुळे कोंबड्यांना विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तणनाशक फवारणीआधी ग्रामपंचायतीने दवंड का दिली नाही ? असा प्रश्न पशू पालकांनी केला आहे. त्या भागातील ग्रामस्थांचा गवत काढण्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज आला होता त्यामुळे त्या ठिकाणी गवतांवर तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याचे उपसरपंच नीळकंठ बढे म्हणाले.