खिर्डी । रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे ऑक्सीजन पार्क (वनस्पती उद्यान)या साठी पर्यटन व रोजगार मंत्री जयकुमार रावळ व जिल्हाधिकारी यांनी नुकतीच मंजूरी दिली असुन ह्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे या ऑक्सीजन पार्क साठी राज्याचे माजी महसुल मंत्री एकनाथराव खड़से, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नांदकिशोर महाजन, तसेच भाजप युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष पवन चौधरी यांनी प्रयत्न केले होते.
विशेष म्हणजे हा पार्क ग्रामीण भागातील एक महत्वपूर्ण पार्क असणार आहे. खिर्डी खुर्द येथील जि.प.मराठी मुलांची शाळा ही ग्रामपंचायतीने ठराव करून जिल्हा परिषेदेचे प्राथमिक शिक्षणाअधिकारी यांच्या कड़े या जागे संदर्भात मागणी केली होती त्या नुसार ती मंजुर होवुन पन्नास हजार स्केअर फुट जागेवरती हा पार्क तयार होणार आहे अशी माहीती ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप युवा मोर्चा ता अध्यक्ष पवन चौधरी यांनी दैनिकाशी बोलतांना सांगितले.