खिर्डी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायीतर्फे गावात निर्जंतुकीकरण केले जात असून टीसीएल पावडरची फवारणी केली जातआहे. सध्या कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव राज्यात पाहायला मिळत आहे. गावांमध्ये कोणताही कोरोनाचा परीणाम होऊ नये यासाठी ग्राम विकास अधिकारी गोकुळ सोनवणे, जितेंद्र फालक, विपीन झांबरे व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांच्यावतीने फवारणी करण्यात आली.
खिर्डीत सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी
यावेळी संपूर्ण गावात, गटारी, घरे, बस स्टॅण्ड परीसरात फवारणी करण्यात आली. तसेच गावात दूध, मेडिकल, किराणा,भाजीपाला सारख्या अत्यावश्यक सेवा दुकानासमोर शिस्तबद्ध पद्धतीने एक मीटरच्या अंतरावर चुना टाकून ग्राहकांना रांगेत वस्तू देण्याचे सूचना देण्यात आल्या.