खिर्डी । येथील दलीत वस्तीत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून दोन लाख रूपयांचा निधी तीन महिन्यांपासून मंजुर असून ग्रामविकास आधिकारी डी.आर.जयंकार दुर्लक्ष करीत असुन हा निधी परत जाण्याची शक्यता असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य जगदीश कोचुरे यांनी केली आहे. कोचुरे यांनी पंचायत समितीत गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच दलीत वस्तीचे काम लवकरात लवकर मार्गी लावून येथील रहिवाशांच्या समस्या सोडविण्याची मागणी जगदीश कोचुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परीषदेकडून दलीत वस्तीत रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी मंजुर आहे. परंतु त्या रस्त्यावर अतिक्रमण असल्याचे काम सुरु करण्यास विलंब होत आहे. संबंधीत अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. अतिक्रमण हटल्यावर लवकरात लवकर काम मार्गी लागेल.
– डी.आर.जयंकार,
ग्रामविकास आधिकारी