खिर्डी बुद्रुक येथे महाआरोग्य मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

0

खिर्डी- खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे 14 व्या वित्त आयोगांतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत खिर्डी बुद्रुक यांच्या 14 व्या वित्त आयोगांतर्गत तसेच ग्रामनिधीतून रेड स्वस्तिक सोसायटी व ग्लोबल फाईव्ह हार्ट केअर हॉस्पिटल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर गुरूवारी झाले. शिबिरांमध्ये 503 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले व 36 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कांताई हॉस्पिटल, जळगाव येथे पाठविण्यात आले. शिबिरासाठी रावेर पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

यांची शिबिरास प्रमुख उपस्थिती
शिबिरांमध्ये रेड स्वस्तिकचे सह महाव्यवस्थापक अशोक एस.शिंदे, कांबळे, डॉ.मसूद रहेमान मलिक, नूतन चोकले, संतोष चोकले व ग्लोबल फाईव्ह हार्ट हॉस्पिटलचे अनिल गुंजाळ, किरण शिंदे, अंकिता वाघाडे, ममता भातांडे, श्रीकांत, जितू पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.योगेश पाटील, डॉ.किशोर पाटील आदींसह डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले. प्रसंगी मोतीराम पाटील, भास्कर भिरुड, हाजी शेख मुशीर, झिपरू कोचुरे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, गटविकास अधिकारी एच.एन.तडवी, पोलिस पाटील अरुण पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांनी घेतले शिबिरासाठी परीश्रम
खिर्डी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत कोळी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, सदस्य पंकज राणे, गंभीर पाटील, विनोद पाटील, विनोद कोळी, मोहिनी नेमाडे, शमीम बी., फरझान बी., वैशाली पाटील, उषा तायडे, आशा पाटील, ग्रामविकास अधिकारी डी.आर.जयंकार, शेख अस्लम, किरण नेमाडे आदीने अनमोल सहकार्य केले. शाम आदिवल, विनायक जहुरे, नईम बेग, जगदीश कोचुरे, गणेश बोरणारे, अंकुश जाधव, वेदु कोळी, समर्थ पाटील, ऋषिकेश पाटील, राकेश रायपूर, शिवम कोचुरे, युवराज अवसारमल, अभिषेक शिंदे, राहुल तेली, रोशन जाधव, गफूर कोळी, रीतेश रायपूरे, दिगंबर कोळी, डॉ.पी.डी.कुलकर्णी, आशावरकर, यु.जी.दांडगे, ज्योती भोळाने, संगीता महाजन व अंगणवाडी सेविकांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन राजीव बोरसे यांनी तर आभार सरपंच चंद्रकांत कोळी यांनी मानले.