जळगाव । महाराष्ट्र सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे. सर्वत्र लग्नाची धुमधाम सुरु आहे. सगे सोयरे आप्तेष्ट यांना लग्नाला आमंत्रीत करण्यासाठी लग्न पत्रिका छापणे अनिवार्यच असते. लग्नाच्या आमंत्रणासाठी आजच्या फॅन्सी दुनियेत फॅन्सिबल लग्न पत्रिका छापण्यात येत आहे. लग्न पत्रिका ही सर्वाच्या हातात पडत असल्याने ती एक समाज प्रबोधनासाठी महत्त्वाचा माध्यम ठरु शकतो. ही गरज ओळखुन रावेर तालुक्यातील खिर्डी येथील पाटील परिवार लग्न पत्रिकेच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर संदेश दिला आहे.
झाडे लावा झाडे जगवा
मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात असल्याने त्यांचा विपरीत परिणाम सध्याच्या वातावरणात जाणवत आहे. वृक्ष लागवड वाढल्याने तापमानात वाढ होणे, अवेळी पाऊस येणे, आम्ल पजर्ण आदी होत असतांना दिसत आहे. वृक्ष लागवड करणे यावर एकमेव उपाय असल्याने शासनाने वृक्ष लागवडीसाठी मोहिम हाती घेतले आहे. परंतु शासनाने प्रयत्न करुन काही होणार नसुन प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने प्रियंका आणि पवनच्या लग्न पत्रिकेत झाडे लावा झाडे जगविण्यासाठी समाज जनजागृतीपर संदेश देण्यात आले आहे.
स्त्री-भ्रूण हत्या
‘कुचलु नका हो या कळ्यांना, उमलु द्या हो या फुलांना, जानुया मर्म या बालिकेचा, फुलवु या धर्म हा मानवाचा, जाणोनी अर्थ या जीवनाचा, कन्येस माना पुत्र सरथी या युगाचा’ असा संदेश त्यांनी लग्न पत्रिकेच्या माध्यमातून दिला आहे. पुरुष प्रधान संस्कृतीत वंशाचा दिवा म्हणून मुलाला मानले जात असल्याने स्त्रि-भु्रण हत्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुरसटलेल्या मानसिकतेमुळे आईच्या पोटातच स्त्रि अर्भकाची हत्या केली जात आहे. विविध स्पर्धा, पारितोषीक शासनातर्फे स्त्रि जन्म दर वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
हुंडा बळी दुर्दैवी
आज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. परंतु आजही समाजाची मानसिकता बदललेली नाही. सुशिक्षीत तरुणांकडून मोठ्या प्रमाणात लग्नासाठी मोठ्या रकमेच्या हुंडेची मागणी होत असतांना दिसत आहे. मुलीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचे आणि प्रसंगी हुड्याच्या लोभापायी महिलेचे खुन होत असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहे. हुंडा घेणे आणि देणे दोन्ही बाबी चुकीचे असल्याचे पाटील परिवाराने संदेश दिला.