खिर्डी येथे सभागृह उभारण्याची मागणी

0

निंभोरा । रावेर तालुक्यातील खिर्डी येथे मुस्लिम बांधवांच्या लग्न समारंभासाठी सभागृह आवश्यक असून त्यासाठी 10 लाख व निंभोरा येथील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये गटारी नसल्यामुळे वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याला आळा बसावा म्हणून 10 लाख रुपये अल्पसंख्यांक निधीतून उपलब्ध व्हावा, अशा मागणीचे निवेदन निंभोरा गणाचे पंचायत समिती सदस्य दिपक पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षांसह उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना दिले.

जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी दिले आश्‍वासन
यावेळी त्यांच्यासोबत साकेगावचे जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील हेही उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी याबाबत प्रयत्न करण्याचे सांगितले.