खिर्डी येथे हजरत सय्यद कादरी बाबाचा संदल

0

खिर्डी। येथील हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले हजरत सय्यद कादरी बाबाचा संदल सोमवार 3 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दर्ग्यावर रंगरंगोटी करण्यात आली असून संदल मिरवणूकीची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. बाबांच्या दर्ग्यावर चढवण्यात येणार्‍या चादरीची गावातून मिरवणूक काढणार आहोत. या संदलीसाठी परिसरातून शेकडो भावीक येतात.

तरी परिसरातील भाविकांनी संदलचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदलाचे आयोजक शेख असलम, शेख सलमान, शेख आसिफ़, शेख वासिम, शेख मुजफ्फर, शब्बीर शेख, शेख जावीद, मलक मुशीर, शेख कामील, इम्रान खाटीक, फिरोज खान, सर्फराज शेख, शेख.अजगर, इरफान शेख, सकील शेख आदी यांनी केले आहे.