खिर्डी विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तायडे सेवानिवृत

0

खिर्डी खुर्द : येथील शा.प्र.राणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिध्दार्थ किसन तायडे हे मुख्याध्यापक पदावरुन नुकतेचे सेवानिवृत्त झाले. त्यांनी या शाळेत 30 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. यानिमित्त विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप सुभाष भंगाळे, उपाध्यक्ष विलास पाटील, चेअरमन भास्कर गणपत भंगाळे, चिटणीस दत्तात्रय महाजन, सदस्य डॉ.सुनील कोल्हे, भरत लढे, अनिल लढे, एकनाथ नेहते, अनिल चौधरी, चुडामण बोंडे, हेमराज किरंगे तसेच शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक उल्हास लढे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.