पिंपरी-अंघोळीची गोळी आणि इतर पर्यावरप्रेमी संस्थामार्फत मागील ९ आठवड्यांपासून शहरातील निगडी प्राधिकरण आणि संभाजीनगर भागात “खिळेमुक्त आणि आळेयुक्त झाडे” हा उपक्रम राबविला जात आहेत. या अभियानात महापालिकेचा उ्दयान विभाग सहभागी होणार आहे, अशी ग्वाही आयुक्त हर्डीकर यांनी दिली. तशा सूनचा उद्यान विभागाच्या अधिका-यांना त्वरीत दिल्या.
अंघोळीची गोळी या आणि इतर पर्यावरणप्रेमी संस्थांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना अभियानाची माहिती दिली. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे,ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक शर्मिला बाबर, सांगर अंगोळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथीयान, सचिन काळभोर, राजेंद्र बाबर, माधान पाटील, अनिल पालकर, दत्तात्रय जोशी, अण्णा कु-हाडे, संदीप रांगोळे, उल्हास टकले, राहुल धनवे , वसंत सोनार, ज्ञानेश्वर ननावरे आदी उपस्थित होते.
त्यानंतर आयुक्तांनी महापालिका उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, सहायक अधिक्षक प्रकाश गायकवाड यांना दर मंगळवारी उद्यान विभागाची एक टीम या अभियानात सहभागी करण्याच्या सूचना केल्या. याचसोबत आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावणाऱ्यांवर नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. उद्यान विभागाने त्यासाठी आकाश-चिन्ह विभागाची मदत घ्यावी. दुस-या टप्प्यात ‘ट्री ऍक्ट १९७५’ नुसार झाडांवर जाहिरात ठोकणा-यांवर आणि संबंधित जाहिरात मालकावर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे. तसेच, राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार प्राधिकरणातल्या सर्वच झाडांना आळे करण्यासाठी उद्यान विभागाला आदेश दिले.