खुडाणे गाव महात्मा गांधी तंटा मुक्त पुरस्काराने सन्मानित

0

निजामपूर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात निजामपुर पोलीस स्टेशन अंतर्गत 78 गावे 5 बिट आहेत. यापैकी शासनाने 4 गावे तंटा मुक्त केली. यात खुडाणे, ऐचाळे, कढरे,छावड़ी ग्रामपंचायतीच्या समावेश आहे. यागावांना महात्मा गांधी तंटा मुक्त पुरस्कार देवुन सनमानित केले आहे. गावाचा विकास कामासाठी शासनाने खुड़ाणे गावाला चार लाख रुपयांचा चेक अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे याच्या हस्ते निजामपुर येथे देण्यात आला.

स्वच्छता अभियान राबविले : 2015 मध्ये कल्पना माळी ह्या सरपंच बनल्या. उपसरपंच नामदेव गवळे,सदस्य अशोक खलाणे, कनहैयालाल काळे, गंगाधर भदाणे, चैत्राम सोनवणे, मुलकन वाघ, महारुमाळचे महेंद्र हेमाड़े, शालीग्राम देवरे ,राजेन्द्र खैरनार, माजी सरपंच धनराज माळी, ग्रामविकासी अधिकारी एन. डी. मोहिते चा सहकार्य ने कामाला सुरुवात केली.पावसाळा सुरू होत असल्यामुळे गावातील तरुणांना.एकत्र करून गावात व परिसर विविध प्रकारचे वृक्ष लागवड केली. गावात प्रदुषण मुक्त होळी व स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले. कल्पना माळी यांनी खुड़ाणे गांव आदर्श करण्यासाठी ग्रामसभा बोलवुन विकास कामांना मंजूर करून शासनाकडे पाठपुरावा करत कामांना सुरुवात केली. यात अमरधाम दुरुस्ती करून बोरवेल केली. झाडे लावणे, गावात सिमेंट रस्ते तयार करणे यासारखी कामे केलीत. मुलाच्या शिक्षणासाठी शाळा डिजीटल केली. गावांत दोन बोरवेल केल्याने महिलांची डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठीची भंटकंती थांबविली आहे. दारुबंदी ठराव करून लोकांचा व महिला चा मदतीने गावात दारु बंदी केली.

यांचे लाभले सहकार्य
घटबारी धरणाचे काम लोकसहभागातून दुरूस्ती करून पाणी खुडाणेसह परिसरातील आठ ते दहा गावांच्या पाणीचा प्रश्न सुटला आहे. गाव तंटा मुक्त करण्यासाठी विश्राम खैरनार, पांडुरंग महाले, संतोष खैरनार, दिलीप गवळे, मधुकर वाघ, विनोद गवळे, विलास खैरनार, भरत खैरनार, पोपट बाविस्कर यांच्या सहकार्याने कार्य केले. गांव तंटा मुक्त होण्या साठी विशेष सहकार्य व मदत निजामपुर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पटले बीट हवालदार रायते, लोहार याचे मिळाले गावकर्‍यांचे सहकार्य मिळाले.