खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह यावल पोलीस ठाण्यात

0

यावल : तालुक्यातील मोहराळे येथील पिंटू भगवान अडकमोल (37, मोहराळा) या इसमाचा अपघाती नव्हे तर खुनानेच मृत्यू झाल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शवविच्छेदनानंतर मृतदेहच पोलीस ठाण्यात आणण्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. संतप्त जमावाने काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न करूनही नातेवाईक मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.