जळगाव । ओझर रोड धरण (भुसावळ) येथे दोघांवर प्राणघातक हल्ला चढवून एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या खटल्याच्या चौकशीअंती खटल्यातील आरोपी शेख अल्ताफ यास सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने दोषमुक्त केले. 09 ऑगस्ट 13 रोजी ओझर खेड धरण येथे शेख अल्ताफ शेख पप्पू व शेख कदीर यांनी दोन साथीदार कामगारांवर लोखंडी रॉड व लोखंडी पाईप टाकून एकाचा मृत्यू केला होता.
याप्रकरणी दोघा आरोपीविरूध्द भादवी कलम 302,307,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील कदीर हा आरोपी घटना घडल्यापासून फरार झाला. शेख अल्ताफ हा 19 ऑगस्ट 14 पासून कारागृहात वास्तव्यास होता. त्यामुळे त्याच्याविरूध्द खटल्याचे कामकाज चालविण्यात आले. सरकार पक्षाने 12 साक्षीदार तपासले. भुसावळ येथील सत्र न्या. डोलारे यांनी सबळ पुराव्याअभावी अभावी आरोपीस आरोपातून मुक्त केले. आरोपीतर्फे ड. एस.के.कौल यांनी कामकाज पाहिले.