जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना अभिवचन रजेवर आलेला कैदी पसार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला गुरुवारी तांबापुरा भागातून अटक केली आहे. बारकू बाबुराव कोळपे (35, रा.तांबापूरा, गवळीवाडा, जळगाव) असे अटकेतील या आरोपीचे नाव आहे.
अभिवचन रजेवर आल्यानंतर आरोपी पसार
धुळे पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात बारकू कोळपे यास धुळे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असतांना 5 जून 2021 रोजी आरोपी कोळपे याला यास कोरेाना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुदतीत आरोपी बारकू कोळपे हा कारागृहात पुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवा, 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजता गोपनिय माहितीच्या आधारे तांबापूरातून आरोपी बारकू कोळपे याला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, नाना तायडे यांनी आरोपीला तांबापूर्यातून अटक केली. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.