जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली महिला बंदी कोरोना काळात रजेवर आल्यानंतर पसार झाला होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने आरोपी महिला तिच्या टोणगाव, ता. भडगाव येथून सोमवार, 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अटक केली. नर्मलाबाई अशोक पवार (टोणगाव, ता.भडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
रजेवर आल्यानंतर महिलेचे पलायन
खुनाच्या गुन्ह्यात मालेगाव पोलिस ठाण्यात 2011 मध्ये दाखल गुन्ह्यातील निर्मलाबाई अशोक पवार या महिला आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. ती नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना शासनाच्या आदेशान्वये कोरोना प्रादुर्भावमुळे बंदी कैद्यांची 4 जुन 2022 पर्यंत रजेवर सोडण्यात आले होते. दिलेल्या रजेच्या मुदतीत महिला आरोपी ही नाशिक जेलमध्ये हजर न झाल्याने तिला फरार घोषीत करण्यात आले. महिला आरोपी ही तिच्या गावात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तिला गावातून सोमवारी सकाळी वाजता तिला अटक केली
यांनी आवळल्या आरोपी महिलेच्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, विनोद सुभाष, महिला हवालदार रत्ना मराठे, उपाली खरे, चालक राजेंद्र पवार यांनी आरोपी महिलेला अटक केली.