भुसावळ : चाकूने हल्ला करीत लोखंडी रॉडने तसेच लाकठी काठ्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पसार आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शेख अबरार शेख समसोद्दीन (25, रा.मणियार कॉलनीजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी होता पसार
तक्रारदार शेख नाजीस शेख नासीर (रा.मणियार कॉलनी, भुसावळ) यास यातील आरोपी यांनी 16 ऑगस्ट रोजी 10.30 वाजता पाईप-लाईनमध्ये विटा टाकण्याच्या कारणावरून वाद घालत चाकूने हल्ला केला तसेच लोखंडी रॉडने तसेच लाकडी काठीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता.
गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
पसार आरोपीबाबत सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी भागातून आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंड, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, किशोर महाजन, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, कृष्णा देशमुख, चालक अयाझ सय्यद आदींच्या पथकाने केली.