गनी शाह उर्फ मुन्ना शाह खून प्रकरण
चाळीसगाव शहर पोलीसांची कामगिरी
चाळीसगाव – मागील वर्षी येथील अनिल नगरातील गनी शाह उर्फ मुन्ना शाह याचा निर्घृण खुन करुन फरार असलेल्या दोघा आरोपींना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोनि रामेश्वर गाडे पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन सपोनि आशिष रोही, पोउनि राजेश घोळवे, हवालदार बापुराव भोसले, पोलीस नाईक नितीन पाटील, राहुल पाटील, पोकॉ राहुल गुंजाळ, प्रविण सपकाळे यांनी आज २१ नोव्हेंबर रोजी शहरातील मालेगाव रोडवरुन अटक केली असुन आतापर्यंत या गुन्ह्यातील १२ आरोपी अटक झाले असून यापैकी अजून दोघे फरार आहेत.
शहरातील अनिल नगर मधील गनी शाह उर्फ मुन्ना शाह गुलाब शाह या तरुणाचा २६ मे २०१७ रोजी येथील करगाव रोडवरील वाय.पी.पाटील हॉस्पीटलजवळ असलेल्या उन्नती मंडळाजवळ लाकडी दांडे, चाकु व तलवारीने निर्घृण खुन करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकुण ११ जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील ७ आरोपींना अटक केली होती मात्र ८ आरोपी फरारच होते. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील आरोपी ईम्रान हुसेन बेग मिर्झा, विशाल उर्फ सनी दिलीप जैस्वाल, चिंटु उर्फ अमोल दिलीप जैस्वाल यांना अटक केली होती. या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी चाळीसगाव येथे मालेगाव रोडवर असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन पोलीसांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आरोपी हर्षल रमेश गायकवाड (वय-३०) रा.कलालवाडी चाळीसगाव, भूषण पोपट बोरसे (वय-३५) रा. पवार वाडी चाळीसगाव यांना अटक केली आहे. पुढील तपास सपोनि आशीष रोही करीत आहेत.