जळगाव। धरणगांव येथे प्रौढास मारहाण झाली होती. यात प्रौढाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिघांविरूध्द पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तिघांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असता तोेफेटाळून लावला आहे.
9 एप्रिल रोजी रात्री 7.30 ते 8.30 वाजेच्या दरम्यान मोबीन अली आबेद अली कादरी यांना शेख युनूस शेख गुलाम रसूल, शबाना शेख युनूस शेख अरशद शेख युनूस या तिघांनी बेदम मारहाण केली होती. त्यात मोबील अली यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरूध्द धरणगाव पोलिसात ा दाखल करण्यात येवून त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, जामीन मिळावा यासाठी तिघा संशयितांनी न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज गुरूवारी कामकाज होवून न्या.चित्रा हंकारे यांनी तिघा संशयितांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.