जळगाव । पूर्ववैमनस्यातून दोघांनी एका तरूणाचा डोके फरशीने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी पहाटे शनिपेठेतील शनिमंदिरासमोरील गल्लीत घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी अठरा तासात दोन्ही संशयिताना अटक केली आहे. त्यातील एकाला आसोदा रस्त्यावरून तर दुसर्याला मुंबई येऊन अटक होती. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शनिपेठेत शनिमंदिराजवळ असलेल्या ओंकार वाणी यांच्या घराच्या तळ मजल्यात मंगळवारी मध्यरात्री पासून प्रवीण उर्फ नितीन सुरेश माळी (वय 28, रा. सत्यम पार्क), भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय 26, रा. विसनजीनगर) आणि राहूल जयराम सपकाळे (वय 23, रा. काचंननगर) हे तिघे दारू पिऊन पत्ते खेळत बसले होते. बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास भिमाने प्रवीणचा डोक्यात फरशी मारून खून केला होता. त्यानंतर पंकज आणि राहूल दोघे फरार झाले होते. यानंतर त्याच दिवशी राहूल सपकाळे याला आसोदा रस्त्यावरून अटक केली. तर दुसर्या दिवशी मुख्य संशयीत पंकज याला पोलिसांनी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले होते. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज रविवारी संशयित राहूल व पंकज यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यांना न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. चौधरी यांनी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, पोलिसांनी खुनासाठी वापरलेला दगड ताब्यात घेतला आहे.