जळगाव । बेंडाळे चौकात गुरूवारी रात्री दोन मोटारसायकलस्वार तरुणांनी एका पादचार्याला बांबूने मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही संशयीताना ताब्यात घेतले होते. त्यातील एक अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली. तर दुसर्याला सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
24 मेपर्यंत सुनावली कोठडी
तुकारामवाडीतील संदीप वाणी (बोरसे, वय 22) व एक अल्पवयीन मुलगा हे दोघे गुरूवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत जात असताना बेंडाळे चौकात एका पादचार्याला त्यांच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून त्यांच्यात वाद होवून दोघांनी त्यात तरूणाला बेदम मारहाण केली. मात्र दोघांनी त्याला बांबूने मारहाण केली. त्यात त्या अनोळखी पादचार्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संदीप वाणी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. संदीप याला सोमवारी न्यायाधीश कस्तुरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी तर संशयीतातर्फे अॅड. अजय सिसोदीया यांनी कामकाज पाहिले.