वाघोड येथील बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे
रावेर- मंत्री करा अथवा न करा त्यामुळे फरक पडत नाही, जनतेची कामे करण्यावरच आपला भर राहणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे वाघोड येथील बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात म्हणाले. वाघोड येथे गण व बुथ प्रमुखांचा शनिवारी मेळावा झाला. भाजपा सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा, बुथ प्लस तसेच ओव्हर फ्लो करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्र सरकाच्या योजनांचे व कामांचे तोंडभरून कौतुक करून जनतेने लाभ घेण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परीषद सदस्य कैलास पाटील, रंजना पाटील, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, वाघोड सरपंच शारदा चौधरी, योगीता वानखेडे, सरपंच श्रीकांत महाजन, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश पाटील, गोपाळ नेमाडे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शिवाजीराव पाटील, सरचिटणीस विलास चौधरी, महेश चौधरी, सुनील पाटील, दुर्गादास पाटील, सुरेश पाटील, प्रल्हाद पाटील आदी भाजपा कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पाल-केर्हाळा गटाचा मेळावा
जिल्हा परीषद पाल-केर्हाळा गटाचा मेळावा रमजीपूरला झाला. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी आगामी निवडणुुकीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परीषद सदस्य नंदा अमोल पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पंचायत समिती सदस्य धनश्री सावळे, प्रमोद धनके, वाघोड सरपंच शारदा पाटील आदी भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते.