खुले भुखंडांचे अस्वच्छतेने डेंग्यू,मलेरीया

0

जळगाव । खुले खाजगी भुखंडमधील अस्वच्छतेमुळे मलेरीया, डेंग्युचे रूग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्याची तक्रार नगरसेवक रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे केली. खुले खाजगी भुखंड मालाकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अस्वच्छ खुले खाजगी भुखंडधारकांचे पत्ते शोधून तात्काळ नोटीस देण्याची सूचना आरोग्य अधिकार्‍यांनी पाळली नाही.

खाजगी भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई
डासांचा प्रर्दूभाव वाढल्याने होत असल्याने नगरसेवक रविंद्र पाटील यांनी वार्डांत स्वच्छता अभियान राबविले. यावेळी त्यांना बर्‍याच ठिकाणी खुले खाजगी भुखंडांमध्ये झाडे-झुडपे, गवत व साचलेल्या पाण्याचे डबके आढळून आले. या खाजगी प्लॉटवरील अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्तीत वाढ होत आहे. यामुळे या खुल्या खाजगी भुखंडांवर शेजारील घरातील लोकांना तसेच कॉलनीतील नागरिकांना थंडी-ताप व अंगदुखीमुळे डेंग्यू, चिकनगुनिया सारखे लक्षणे आढळून येत असल्यानेच तक्रार केली आहे. नागरिक या खाजगी प्लॉटमध्ये साफसफाई करावी अशी वारंवार तक्रार करीत असतात. मात्र, आरोग्य विभागाचे कर्मचारी खुले खाजगी भुखंडावर साफसफाई न करता हे काम आमची जबाबदारी नसल्याचे सांगून पळवाटा काढत आहेत. जुलै महिन्यात प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी पहाणी दौरां केला असता त्यांना रविंद्र पाटील यांनी अशा प्रकारचे खुले भुखंड प्रत्यक्ष दाखविले होते.