जळगाव । जळगाव शहराचे नवनिर्वाचित महापौर ललित कोल्हे यांनी शुक्रवारी शहरातील महानगरपालिकेच्या मालकीची जुनी महानगरपालिका व साने गुरूजी रूग्णालयाच्या खुल्या जागेची पाहणी केली.
यावेळी मनपा अधिकारी देखील उपस्थित होते. पाहणी केल्यानंतर स्वत: उपस्थित राहून जेसीबीच्या सहाय्याने जागेचे सपाटीकरून महापौरांनी करून घेतले. यातच त्या ठिकाणाची सफाई देखील करण्यात आली. तर जागेवर पे अॅन्ड पार्क सुविधा सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी महानगरपालिका कर्मचार्याची नेमणुक करण्यात येवून सुविधा पुरविण्याचे महापौरांनी आदेश दिलेत. सदर प्रसंगी महापौर ललित कोल्हे यांचेसोबत माजी उपमहापौर सुनिलभाऊ महाजन, मनपा सदस्य अनंत (बंटीभाऊ) जोशी, सहाय्यक अभियंता सुनिल भोळे, आरोग्याधिकारी विकास पाटील, अभियंता नरेंद्र जावळे, आरोग्य अधिक्षक बडगुजर, आरोग्य निरीक्षक नेमाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते चंदन कोल्हे तथा महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.