जळगाव : महाराष्ट्र शासनाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्या असून त्याकरिता “पायलट प्रोजेक्ट” म्हणून मू.जे.महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे
राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे सुरु केले आहे. २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन स्वरुपात सुविधा शिष्यवृत्ती केंद्राद्वारेच अर्ज भरावयाचे आहे. त्याकरिता उत्पन्नाचा दाखला, आधार संलग्नता बँक अकाउंट खाते, मागील वर्षाचे मार्कशीट, रेशनकार्ड, पालक अल्पभूधारक शेतकरी असल्यास त्याचे प्रमाणपत्र, पालक रोजगार हमी योजना मंजूर असल्यास जॉबकार्ड या बाबी विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे आहे.
शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील प्राचार्यांशी विचारविनिमय करण्यासाठी २९ रोजी बैठक आहे. त्याकरिता सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले आहे.