खुशखबर: गिरणा धरण १०० टक्के भरले !

0

जळगाव: गेल्या काही वर्षांपासून गिरणा धरण १०० टक्के भरले नव्हते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात गिरणा धारणा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा नदी काठच्या गावांना याचा मोठा लाभ होणार आहे. गिरणा धरण १०० टक्के भरल्याने १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला आहे.

चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव शहरानजीकच्या अनेक गावांना गिरणेच्या पाण्याचा लाभ होत असतो. मागील वर्षी या धरणात अत्यल्प पाणी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र हे धरण १०० टक्के भरल्याने पाणी टंचाई दूर होणार आहे.