जळगाव : येथील प्रसिध्द सर्जन डॉ.सचिन इंगळे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सोनल इंगळे यांच्या खुशी हॉस्पिटलच्या नवीन वास्तूचा नुकताच अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ.सी.जी. चौधरी व डॉ. शैलजा चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत इंगळे, जया इंगळे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, स्कॉटलंड येथील डॉ.प्रल्हाद कोल्हे आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधा
नवीन अद्ययावत व अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध असणार्या सुसज्ज नूतन वास्तूमध्ये स्त्रीरोग विभाग, शल्यचिकित्सा विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया विभाग असून, अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा कॅन्सर उपचार व शस्त्रक्रिया विभागदेखील आहे. खुशी हॉस्पिटलच्या या उद्घाटन सोहळ्या शहरातील मान्यवरांनी व असंख्य नागरिकांनी उपस्थिती दिल्याबद्दल डॉ.सचिन इंगळे व डॉ.सोनल इंगळे यांनी आभार व्यक्त केले आहे.