खुश खबर : सेंसेक्समध्ये ६०० अंकांनी वाढ

0

मुंबई : सेंसेक्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होते आहे. आजही सेंसेक्स ६०० अंकांनी तर निफ्टी १९४ अंकांनी वधारला. सेन्सेक्स आज ६०० अंकांनी वाढून १०,२५१,३० अंकांवर बंद झाला आहे.तर निफ्टी ३४,०६७.४० अंकांवर बंद झाला आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्राच्या सुरुवातीला आज सेंसेक्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेली ही वाढ सुखद असून पुढच्या आठवड्यातही अशीच वाढ सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एशियन पेंट्स,येस बॅंक,हीरो मोटोकॉर्प , इंडसलँड बँकेचा शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.