खूनप्रकरणात संशयिताला सात दिवस कोठडी

0

जळगाव : कासोदा येथील तरुणाच्या खूनप्रकरणात अटकेतील संशयीत धनराज भीमराव राक्षे याला जळगाव न्यायालयाने पुन्हा सात दिवसांचा पोलिस रिमांड दिला आहे. तपासातील प्रगती व जटील पुरावे संकलाच्या आधारे अचुक तपासा करीता न्यालयाने 1 जानेवारी 2017 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयीताला मंगळवार रोजी अटक करण्यात आली असुन गावात अद्यापही तणावाची परिस्थीती असुन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाजीम शेख निजाम (वय 21) हा 18 जुलैला बेपत्ता झाला होता. याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात 20 जुलैला तो हरवल्याची नोंद करण्यात आली. 22 जुलैला नाजीमचा मृतदेह अंजनी धरणाच्या पाटचारीजवळ आढळल्यानंतर त्याचा घातपात झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल होवुन कासोदा पोलिस तपास करीत होते. हा गुन्हा एरंडोल पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर पाच महिन्यांनी याप्रकरणी कासोदा येथून धनराज राक्षे या संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोन दिवस आणि त्यानंतर आज जळगाव न्यायलायात हजर करण्यात आले. या अटकेनंतर काही तरुणांनी कासोद्यात फिरून बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. परस्परविरोधी गट समोर आल्याने गावात काही काळ जातीय तणावाचो वातावरण निर्माण झाले होते.उपअधीक्षक डॉ. संतोष गायकवाड गुन्ह्याचा तपास करीत आहेत. एंरडोल न्यायालया सुटीवर असल्याने जळगावी कामकाज निघाले संशयीत धनराज ऊर्फ भैय्या भिमराव राक्षे याला न्या.आ.बी. ठकुर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले, गुन्ह्याचे गांभीर्य तथा तपासातील प्रगती यावर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. आशा शर्मा यांनी युक्तीवाद करीत बाजु मांडली. न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सात दिवासांची कोठडी सुनावली आहे. बचावपक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.