Murder of youth in Jalgaon : Suspect Woman Finally Arrested जळगाव : जळगावच्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने. सतकौरसिंग बावरी या महिलेला जळगावात तरुणाच्या खून प्रकरणी अटक केली आहे. संजयसिंग टाक या तरुणाची फटाके फोडण्याच्या वादातून हत्या करण्यात आली होती तर यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हा घडल्यापासून संशयीत आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी ही मनमाड येथे लपून असल्याच्या माहितीवरुन गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे व महिला कर्मचारी सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने महिला आरोपीस अटक केली. . पोलिस पथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने पाठलाग करत तिला ताब्यात घेत अटक केली.
संशयीत 5 पर्यंत कोठडीत
अटकेतील मोहनसिंग बावरी, मोनुसिंग जगदीश बावरी, जगदीश हरीसिंग बावरी व सतकौर जगदीशसिंग बावरी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता 5 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे, म पोकाँ सपना ऐरगुंटला तसेच मनमाड शहर पोस्टेचे सागर महाले आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.