खून्नस दिल्याच्या कारणावरुन तरुणास टोळक्याकडून मारहाण

0

पिंपरी : दिघी येथे एका तरुणास रस्त्यावरून जाताना खुन्नस का दिली म्हणून टोळक्याने जबर मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.24) मध्यरात्री दिघी येथे घडली. अदित्य अरविंद भोसले (वय 20 रा. वर्ल्ड सोसायटी) असे जखमी मुलाचे नाव आहे.दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरुन जातान खून्नस का दिली अशी विचारणा करत तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या घरा समोरच लोखंडी रॉड व हाताने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. भोसले हा डी वाय पाटील विधी महाविद्यालयात पदवीच्या दुस-यावर्षात शिक्षण घेत आहे.