Threatening To kill a married woman by molesting her : A Case Against One In Nimbhora Police रावेर : 24 वर्षीय विवाहितेशी अश्लील भाषेत संभाषण करीत तिचा विनयभंग करण्यात आला तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकाविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अश्लील संभाषण करीत शिविगाळ
रावेर तालुक्यातील एका गावाील 24 वर्षीय विवाहिता मुलांना बिस्कीट घेण्यासाठी दुकानावर गेल्यानंतर आरोपी महादू सीताराम महाले याने महिलेजवळ अश्लील संभाषण करत शिविगाळ केली. पीडीत विवाहितेने विरोध केल्यावर तिच्या दिशेने वीट फेकून मारली तसेच मी जेलमधून सुटून आल्यावर पहिले तुझा खून करेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी निंभोरा पोलिसात पीडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी महादू महाले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स.फौ.राजेंद्र काशीनाथ पाटील करीत आहेत.