खून केल्यावर लपविलेली रिक्षा, दुचाकी संशयितांनी दिली काढून

0

हरिविठ्ठल नगरातील प्रकरण ; गुन्ह्यात केला होता वाहनांचा वापर

जळगाव : विवाहिते अनैतिक संबंधातून हरिविठ्ठल नगरातील विनोद महाजन (वय 18) या तरूणाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेत संशयित दोघा भावंडांनी रिक्षाचा तसेच दुचाकीचा वापर केला होता. घटनेनंतर संशयितांनी ही वाहने वेगवेगळ्या कंपनीत लपवली होती. तपासात संशयितांनी लपविलेली रिक्षा तसेच दुचाकी काढून दिली आहे. पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेतली आहेत.

साक्षीदार दोघांचे जबाब
20 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मयत विनोद व हे दोघे साक्षीदार हे काम आटोपून पंचमुखी हनुमान मंदीराकडून जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळील पेट्रोलपंपा समोरून दोघे संशयीत आरोपी दुचाकीने येऊन तिघांना थांबविले. विनोद यास तु रेकॉडींग करतो का,असे म्हणत चापटा बुक्कांनी मारहाण केली. त्यानंतर विनोद याला बसवुन ईच्छादेवी चौकाकडे घेऊन गेले. तेथुन त्याला रामेश्वर कॉलनीत घेऊन गेले. त्यानंतर मयत विनोद याल कोणीही पाहिले नसून दि.21 रोजी रेल्वे पटरीवर विनोद याचा मृतदेह आढळून आला अशी माहिती जबाब नोंदवितांना साक्षीदार शेखर संजय मिस्तरी (22) रा.शांतीनगर तसेच शुभमनाना गोसावी (20) रा. हरिविठ्ठलनगर हनुमान मंदीराजवळ यांनी पोलिसांनी दिली आहे.

30 डिसेंबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी
या गुन्हयातील दुचाकी क्रमांक एम.एच. 19 सी.टी. 6583 ही संशयीताने एमआयडीसीतील कार्बोकेम कंपनीत लावली होती. ती संशयीताने पोलिसांना काढुन दिली. तर दुसर्‍या संशयीताने रिक्षा क्रमांक एम.एच. 19 सी.डब्ल्यू. 1282 ही तो कामाला असलेल्या सिध्दीविनायक पोलीमर कंपनीत लावली होती. सदर दोन्ही वाहने तपासकामी पोलिसांनी जप्त केली आहेत. संशयीतांनी मयत व महिलेच्या संभाषणाचे ध्वनीफित साक्षीदारास ऐकवली होती. ती तपासात हस्तगत करणे बाकी असून मोबाईल जप्त करावयाचा आहे. पोलीस कोठडची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना 30 डिसेंबरपर्यत वाढीव पोलीस कोठडी सुनावली.