तीन निष्पांपांना मात्र कोठडीची शिक्षा : शहापूर पोलिसांकडून लवकरच होणार गुन्ह्याचा उलगडा
मुक्ताईनगर- मध्यप्रदेशातील नेपानगर तालुक्यातील नावरा पोलीस ठाणे हद्दीत शेख रफीक शेख नाथु या ईसमाचा खून झाला होतर तर या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती मात्र खून झालेला ईसम जिवंत असल्याची व तो कोथळीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगर व शहापूर पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले. या प्रकरणाचा खोलवर तपास नावरा पोलिसांकडून सुरू असून लवकरच त्यातून धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
गुप्त माहितीनुसार कारवाई
खेडा, ता.नेपानगर येथील मूळ रहिवासी असलेल्या शेख रफिकचा सुमारे तीन महिन्यांपूर्वी खून झाला होता मात्र त्याचा मृतदेह आढळला नव्हता. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर तीन संशयीतांना पोलिसांनी अटक केली होती तर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. मयत ईसम हा कोथळीत नातेवाईकांकडे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पाटलाकडून त्याबाबत खातरजता करण्यात आल्यानंतर मध्यप्रदेशी व मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या संशयीतांचा ताबा घेतला.