पिपरी : देहूरोड परिसरात दीड वर्षांपूर्वी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारास पिंपरी पोलिसांनी अटक केली. अंगद बळीराम कांबळे (वय 23 रा. राजीव गांधी वसाहत, नेहरुनगर, पिंपरी) त्याचे नाव आहे.
2016 मध्ये अजय उर्फ अँगल वाघमारे (रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याचा दारुच्या नशेत देहुरोड परिसरात नेऊन डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. पिंपरी पोलीस शुक्रवारी गस्त घालत असताना त्यांना या गुन्ह्यातील आरोपी राजीवनगर परिसरात असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कांबळे याला गणपती मंदिराजवळून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले. त्यानुसार कारवाई करुन त्याला द्हुरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पिंपरीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, शाकिर जिनेडी, प्रभाकर खणसे, पोलीस नाईक जावेद पठाण, माहदेव जावळे, संतोष दिघे, दादा धस, निलेश भागवत, सुहास डंगारे यांनी केली.