जळगाव : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ सुमारे तीन महिन्यांपूर्वी जुन्या वादातून विजय सुरेश ओतारी (27, रा.तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात खूनासह आर्म अॅक्टच्या कलमान्वये आकाश उर्फ अकी रवींद्र मराठे (तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार होता. संशयीत महाबळ परीसरातील गाडगे बाबा चौकात वावरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाल्यानंतर सोमवारी संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय शामराव पाटील, प्रीतम पिंताबर पाटील आदींच्या पथकाने केली. संशयीताला तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.