मुंबई । बापट आणि सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही, किमान चौकशी होणे गरजेचे आहे, चौकशी करून कारवाई करू असे सांगितले. मात्र विरोधक कुठल्याही स्थितीत ऐकायला तयार नव्हते. प्रकरण आलेय मग त्याची शहानिशा करायची नाही का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी खुनाच्या प्रकरणी देखील चौकशी करावी लागते असे विरोधकांना घाटकोपर प्रकरणी झालेल्या चर्चेत सांगितले. तर शिक्षणमंत्री तावडे यांनी कुठल्याही मंत्र्यांवर आरोप करण्याआधी नोटीस द्यावी लागते मात्र तशी कुठलीही नोटीस दिली नाहीये, त्यामुळे हा विषय कामकाजावरून काढण्याची मागणी केली यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत सभात्याग केला.
विधानसभेत विखे पाटलांनी घाटकोपरचे हे नवे प्रकरण समोर आणल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मेहता यांनी सभागृहाबाहेर खुलासा केल्याचे सांगितले.