खूप अभ्यास केल्यानंतर गझल कळते : प्रा. पाटील

0

मराठी गझलशास्त्र पुस्तक प्रकाशन

आकुर्डी : गझलकारांनी समन्वयाने गझलसेवा केल्यास भट यांनी मराठी काव्यरचनेला गझलेचे जोडलेले पान पुन्हा सुवर्ण अक्षरांनी जोडले जाईल. गझलेतून प्रेमाची गोष्ट सांगितली जाते. गझल लेखन करणे अवघड असून खूप अभ्यास केल्यानंतर खरी गझल कळते, असे गझलकार प्रा. तुकाराम पाटील यांनी येथे व्यक्त केले. हिंदी-उर्दू साहित्य अकादमीच्यावतीने शायर सय्यद आसिफ यांच्या मराठी गझलशास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन बीना एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल खान यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदी-उर्दू साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष राज अहेरराव, रमेश वाकनीस, जिया बागपती, गझलकार विजया सिंघानिया, रपिक अत्तार, रपिक काजी, सुरेश कंक, सविता इंगळे, सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

सध्या गझलेला चांगले दिवस
प्रा. पाटील पुढे म्हणाले की, उर्दू, हिंदी व मराठी बरोबरच देशातील विविध भाषांमध्ये गझल म्हटली जात आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. गझलेच्या क्षेत्रात गझलकारांकडून होणार्‍या नाविन्यपूर्ण रचना पाहता सध्या गझलेला चांगले दिवस आले आहे. राज अहेरराव म्हणाले की, कवीनेही अन्य कलावंताप्रमाणे रियाझ करावा. रदिफ, काफिया जुळले की गझल होते. हे साफ चुकीचे आहे. अंतकरणाचा वेध घेते ती करी गझल असते. रमेश वाकनीस यांनी प्रास्ताविक केले. माधुरी ओक यांनी सूत्रसंचालन केले. उज्वला केळकर यांनी आभार मानले.