खेकडा येथे कायदेविषयक शिबीर चर्चासत्र

0

नवापूर । तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीतर्फे मौजे खेकडा येथे कायदे विषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायमुर्ती एन .आर .यलमाने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, खेकडा गावाचे सरपंच अंजना मावची, उपसरपंच माधव गावीत, शिरीष मावची, सरकारी वकील अ‍ॅड. धर्मसिंग वळवी, बारअसोशिएनचे अध्यक्ष रामु वळवी, उपाध्यक्ष अ‍ॅड. टी.जी वसावे, अ‍ॅड. अनिल शर्मा, अ‍ॅड आय.एस.टीमोल, अ‍ॅड. पी.जी गावीत, अ‍ॅड. प्रेम वसावे, अ‍ॅड. वर्षा वसावे, अ‍ॅड.दिपा वसावे, अ‍ॅड. बाळु गावीत, अ‍ॅड.रुतुल कुलकर्णी, अ‍ॅड. राहुल गौरे, अ‍ॅड. मनिषा पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. न्यायमुर्ती एन.आर.यलमाने म्हणाले की आदिवासी समाजातील लहान वयातील लग्न करणे ,वयात नसताना देखील रुढी परंपरा यासाठी निर्णय देताना अडचणी येत असतात. रेशन कार्ड,जन्माचा दाखला देण्यासाठी काहीच पुरावा नसतांना त्यांना पैसे कसे दयाचे यांची अडचण येत असते. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे मराठी भाषा बोलता येत नाही. व अनेक अडचणी येतात.आदींचे श्री यलमाने यांनी स्पष्ट करुन मार्गदर्शन केले. अ‍ॅड. डी.बी वळवी,अ‍ॅड. आर.एन.वळवी, डॉ खैरनार, अ‍ॅड. टिमोल,अ‍ॅड. अनिल शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन अ‍ॅड. बाळु गावीत यांनी केले.