खेडीदिगर बस स्टँड येथून पिस्तुलासह दोघांना अटक

0

शहादा । तालुक्यातील खेडीदिगर बस स्टँड चौकात शनिवार 12 मे रोजी रात्री 8.30 वाजता म्हसावद पोलीसांनी दोघांना पिस्तुल व मोटरसायकलीसह अटक केली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसावद पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे खेडीदिगर बस स्टँड चौकात शनिवार 12 मे रोजी सापळा रचून आरोपींना अटक केली. संशयीतांजवळील 30 हजार किंमतीची काळ्या रंगाची , दुसरी सिल्व्हर रंगाची पिस्तुलासह दोन मोटरसायकली व मोबाईल जप्त करण्यात आले. यात एक मोटरसायकल 45 हजार रूपयांची तर दुसरी मोटरसायकल 25 हजार रूपयांची आहे. ही कारवाई सपोनि राकेश चौधरी, पीएसआय के. टी. दाभाडे, प्रदिप राजपूत, चंद्रकांत चव्हाण, गुरूदेव मोरे, भाऊ गिरासे, राजेंद्र काटके, कांतीलाल वाळवी यांच्या पथकाने केली.