खेडी खुर्द गावहागणदारीमुक्त घोषीत

0

जळगाव । केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपुर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न देखील सुरु आहे. दोन वर्षापासून हागणदारीमुक्तीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. यात यश येतांना दिसत असून जिल्ह्यातील एकापाठोपाठ एक गावे हागणदारीमुक्त होत असतांना दिसत आहे. एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द ग्रामपंचायत शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आले आहे. राज्यशासनातर्फे मनोज गावंडे यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन गावात तपासणी केली.

वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, आंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला भेट देऊन तपासणी केली. तपासणीत त्यांना समाधानकारक कामगिरी दिसून आल्याने त्यांच्या शिफारशीनुसार गाव हागणदारीमुक्त घोषीत करण्यात आले आहे. मनोज गावंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती सभापती रजनी सोनवणे, सरपंच कासुबाई सोनवणे, ग्रामसेवक ए.एन.पाटील, उपसरपंच मालु भिल, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.