खेडी बु.॥ च्या विकासो संचालकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

0

निंभोरा- रावेर तालुक्यातील खेडी बु.॥ येथील रहिवासी व विकासो संचालक मधुकर जाधव (55) यांचा कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.50 वाजेपूर्वी घडली. निंभोरा येथील डाऊन रेल्वे लाईन खांबा क्रमांक 470/28/20 जवळ त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत निंभोरा पोलिसात उपस्टेशन मास्तर यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत इसमाने आत्महत्या केली की अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला ? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपास एएसआय अन्वर तडवी करीत आहेत.