खेडी येथे ग्रामसेवकाला तरूणाकडून मारहाण 

0
जळगाव- खेडी येथील ग्रामसेवकाला सोमवारी सकाळी 11.15 वाजेच्यासुमारास गावातीलच तरूणाने घरकूलच्या कारणासाठी मारहाण केली. या प्रकरणी ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गिरीश अशोकराव चव्हाण (वय 39) हे सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे ग्रामपंचातीच्या कार्यालयात आले. रोजचे काम सुरू असताना 11.15 वाजेच्या सुमारास गावातीलच अशोक उर्फ कन्ह्या नामदेव सोनवणे (वय 38) हा ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने ग्रामसेवक गिरीश चव्हाण यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. त्याला विचारले असता घरकूलचे काम का करीत नाही. म्हणून चव्हाण यांच्याशी वाद सुरूच ठेवला. अशोक सोनवणे ऐवढ्यावरच न थांबता त्याने चव्हाण यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर चाकू काढून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चव्हाण यांनी अशोक सोनवणे याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि मारहाणकरून जीवेठार मारण्याची धमकी देण्याचा तक्रार दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.