खेडी शिवारात रस्त्यांवर बांधले पत्री घर

0

जळगाव : नवीन वसाहतीत रहदारीच्या रस्त्यांवर घर बांधल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पत्राच्या घराबाबत तक्रार करण्यासाठी रहिवाशांनी थेट उपायुक्तांचे कार्यालयात येवून आपली व्यथा मांडून अतिक्रमण काढून येण्या-जाण्यासाठी रस्ता द्यावा अशी मागणी केली. खेडी शिवारातील शिवनगर, ज्ञानेश्‍वरनगर, सुदर्शन कॉलनी या नवीन वसाहतीकडे जाणार्‍या 40 फुटाच्या रस्त्यात थेट पत्री घरे बांधून अतिक्रमण केले आहे. येण्या-जाण्यासाठी नागरिकांना केवळ पाच फुटाची जागा असून त्या ठिकाणी ही सांडपाणी साचल्याने नागरिकांना जाणे येणे कठीण झाले आहे. हे अतिक्रमण काढले जावे यासाठी नागरिकांनी महापालिकेत येऊन उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांची भेट घेतली.

40 फुटी रस्त्यांवर 35 फुटात घर
खेडी परिसरात नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. त्यात शिवनगर, ज्ञानेश्‍वरनगर, सुदर्शन कॉलनी चा समावेश आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी 40 फुटाचा रस्ता असून या रस्त्यामध्ये काही नागरिकांना थेट रस्त्यामधील 35 फुटात पत्राचे घर तयार केलेली आहे. तसेच या घरांचे सांडपाणी हे पाच फुट असलेल्या रस्त्यात साचत असल्याने नागरिकांना वाहन घेवून जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तर मोठी वाहने जाण्यांसाठी देखील अडचणी निर्माण होत आहे. यामुळे हे अतिक्रमण काढावे याबाबत थेट दहा ते पंधरा नागरिकांनी महापालिकेत आज साडे अकरा वाजता धडक देली. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांची भेट घेवून अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा करून होणार्‍या त्रासाची माहिती दिली. उपायुक्त कहार यांची भेट घेवून नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनाव्दारे अतिक्रमण काढण्याची मागणी केली. यावेळी उपायुक्तांनी मंगळवारपर्यत अतिक्रमण काढण्याबाबत आश्‍वासन नागरिकांना दिले. मात्र मंगळवार नंतर जरी अतिक्रमण काढले नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा नागरिकांना यावेळी कहार यांना दिला.