खेड्यांवर जाणारे मार्ग पोलिसांनी न अडवण्याची मागणी

0

रावेरला दुर्गोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक ; उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याचीही मागणी

रावेर- दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीत रावेर शहरातून खेड्यांकडे जाणार्‍या अनेक मार्गांवर पोलिसांकडून बॅरीगेटस् लावून मार्ग अडवला जातो मात्र त्यामुळे गैरसोय होत असल्याने पोलिस प्रशासनाने याबाबत सकारात्मक दखल घेवून दल करावेत, अशी मागणी दुर्गोत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत भास्कर महाजन यांनी पोलिस प्रशासनाला केली. रविवारी सायंकाळी रावेर पोलिस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांच्या भावनांचा आदर करीत पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सकारात्मक दखल घेण्याची ग्वाही दिली तसेच सर्वांनी कायद्याचे पालन करावे अन्यथा कायदा मोडणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा सूचक ईशाराही त्यांनी दिला.

उघड्यावरील मांस विक्री थांबवण्याची मागणी
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सावदा रोडवरील उघड्यावरील मांस विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी यांनी केली. दुर्गोत्सवात भारनियमन, सीसीटीव्ही, मिरवणुकीच्या मार्गातील खड्डे बुजवण्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अवैध वाहतूक करणार्‍या रीक्षा चालकांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला नगराध्यक्ष दारा मोहम्मद, सार्वजनिक दुर्गोत्सव समितीचे अध्यक्ष पिंटू महाजन,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, नगरसेवक आसीफ मोहम्मद, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, नगरसेवक सादीक मेंबर, पत्रकार दिलीप वैद्य, गयास शेख, काझी साहेब, संजय भोई, काशीनाथ भोई, यूसुफ खान अब्दुल रफीक, अय्यूब मेंबर, आरीफ भाई बारदानवाले, कालू भंगारवाले यांच्यासह मोठ्या संख्येने दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष, शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.