खेड पूर्व भागातील गणपतींचे उत्साहात विसर्जन

0

शेलपिंपळगाव । खेड पूर्व भागाच्या शेलपिंपळगाव, वडगांव घेनंद, कोयाळी, बहुळ, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, साबळेवाडी, दौंडकरवाडी, मोहितेवाडी, मरकळ या गावांमधील सात दिवसांच्या गणपतींचे गुरुवारी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.

ज्यांची घरे नदीजवळ आहेत त्यांनी नदीमध्ये गणेश विसर्जन केले तर वाड्या-वस्त्यांवरील गणेशभक्तांनी पारंपारिक पद्धतीने घरच्या किंवा गावातील मोठ्या विहीरींवर गणेश विसर्जन केले. पावसाने उघडीप दिल्याने विसर्जनात चिमुकल्या बाळ गोपाळांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. बदलत्या काळाचा गणेशोत्सवातील बाप्पांच्या घोषणांवरदेखील झाला आहे. पूर्वी ’गणपती बाप्पा मोरया’ या साध्या सोप्या घोषणांची जागा आता, ’एक रुपयाचा चिंगम, गणपती बाप्पा सिंघम’, ’एक दोन तीन चार, गणपती बाप्पा रॉकस्टार’ यांसारख्या नव्या पिढीतील आधुनिक घोषणांनी घेतली आहे. गणेश मंडळांच्या गणपतींचे अनंत चतुर्दशीलाच होईल, अशी माहिती विविध गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी दिली.