खेडदिगर । खेतीया येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेस च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चंदन बाई बागुल विजयी झाल्या आहे. त्यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आशाबाई निकम यांचा पराभव केला आहे. एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यात भाजप व काँग्रेस अशी सरळ लढत होती. निकालाअंती 13 भाजपा व 2 नगरसेवक काँग्रेसचे निवडुन आले आहेत. यंदा प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडुन द्यावयाचा
होता.
विजयी उमेदवार असे
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेच्या उमेदवार चंदन बाई बागुल याना निवडून दिले आहे. काँग्रेस नेते अरविंद बागुल यांचे पुन्हा खेतीया नगरपालिका वर वर्चस्व राहिले आहे. 13 नगरसेवक भाजपच्या पारड्यात असून देखील लोकनियुक्त नगराध्याक्ष्या म्हणून चंदनबाई काँग्रेस कडून निवडून आल्या आहेत. प्रभाग क्र -1 प्रवीण मधुसुधन निकम 450, भाजपा, प्रभाग क्र 2 शोभा सुर्यकांत येशिकर 386, भाजप विजयी, प्रभाग क्र 3 -हिराबाई रमेश सोनीस 493 भाजप विजयी प्रभाग क्र 4 -उमा उद्धव पटेल 255 भाजप, प्रभाग क्र 5 -हंसाबाई मदनलाल जैन 357 भाजप, प्रभाग क्र 6 -लताबाई देवराम सोनी 296 भाजप, प्रभाग क्र 7 -अलकाबाई मनोहर 322 भाजप, प्रभाग क्र 8 -प्रकाश हिरालाल महाले 416 भाजप, प्रभाग क्र 9 -दुर्गा गणेश 348 भाजप, प्रभाग क्र 10 -गणेश गिरधर पवार 379 भाजप विजयी, प्रभाग 11 -मोहंमद जुबेर 363 भाजप, प्रभाग 12 – राकेश सुदाम चौधरी393 काँग्रेस विजयी, प्रभाग क्र 13-अनिल भगवान चौधरी304 काँग्रेस विजयी, प्रभाग 14-दिपाली धनराज चौधरी 301 भाजप, प्रभाग क्र 15 सुरेश जगन चव्हाण 329 भाजप, दरम्यान यात 218 मतदारांनी नोटा चा वापर केला आहे.