दुबर्ई । येथे संपन्न झालेल्या पहिल्या खेलो इंडिया शालेय क्रीडास्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या संघांनी सुवर्णपदके पटकावली. अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या मुलांनी शेजारील राज्य गुजरातचा पराभव केला तर मुलींच्य निर्णायक लढतीत महराष्ट्राने केरळचे आव्हान परतवून लावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार महाराष्ट्रच्या निहार दुबळे व रेश्मा राठोडने पटकावला. पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचे प्रशांत पवार हे प्रशिक्षक होते तर मुलींच्या संघाची प्रशिक्षणाची धुरा राजेंद्र साप्ते यांनी समर्थपणे सांभाळली. दोन्ही संघातील खेळाडू , स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार व सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले.
गुजरातचा दणदणीत पराभव
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरात वर (5-3,2-3) 7-6 अशी 1 गुण व 5.17 मि राखून दणदणीत मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या रेश्मा राठोडने पहिल्या डावात 9 पैकी 4 मि. व दुसर्या डावात 2.50 मि. जबरदस्त संरक्षण केले. रेश्माला प्रतीक्षा खुरंगे (2.50 मि व 3 मि), प्राची जटनूरे (1.40 मि व 1 मि) व दिक्षा सोनसुरकर (4 गडी) यांनी छान साथ दिली. गुजरातच्या निलम गंगाडियाने पहिल्या डावात 3.30 मि संरक्षण केले.मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचे आव्हान (10-4,1-6) 11-10 असे 1 गुण व 7 मि राखून परतावून लावत सुवर्णपदक पटकावले व आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. महाराष्ट्रच्या विजयात निहार दुबळे (2.30 मि व 1.40 मि) , आदर्श मोहिते (2.30 मि) व संदेश जाधव (2मि व 3 गडी) यांचा सिंहाचा वाटा होता.