खेळांच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविणार

0

नंदुरबार । जिल्ह्यात विविध खेळांचा प्रचार व प्रसार कसा होईल? यासाठी जिल्हा संघटना प्रयत्न करुन स्पर्धा, चर्चासत्रे, प्रशिक्षण, तालुकास्तरावर बैठका असे अनेक उपक्रम राबविणार असल्याचे येथे झालेल्या नंदुरबार जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनच्या पहिल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून खो-खो संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.मनोज परदेशी, वरिष्ठ क्रीडा शिक्षक चंद्रकांत परदेशी,फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रा.मयुर ठाकरे आदी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
यावेळी शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त प्रा.तारक दास, राजेश शहा, भागुराव जाधव, फारुख पठाण, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, प्रा.दिनेश सुर्यवंशी, दिनेश ओझा, जितेंद्र पगारे, विजय जगताप, एस.पी.पाटील, तुषार सोनवणे, प्रा.सुनिल पाटील, महेश भट, भुषण चित्ते, अनिल रौंदळ, जावेद बागवान, अंकुश रघुवंशी, पद्मेश माळी, जगदिश वंजारी, रामा हटकर, पंकज मराठे, नरेश राठोड, जितेंद्र माळी, आनंदा मराठे आदींसह क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रीडा विकासाला चालना
यावेळी मार्गदर्शन करतांना पुष्पेंद्र रघुवंशी म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने खेळाच्या व्यासपीठासाठी एकत्र येणारे कार्यकर्ते ही महत्त्वाची बाब आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात काम करणारे कार्यकर्ते एकत्र येणे म्हणजेच क्रीडा विकासाला चालना देणे आहे. फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी सर्व टीमचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. बैठकीत जिल्हाभरातील क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी आदींची उपस्थिती होती.

विविध क्रीडा प्रकारांचा प्रचार
बैठकीत नंदुरबार जिल्ह्यात विविध खेळांचा प्रचार व प्रसार कसा होईल? यासाठी जिल्हा संघटना प्रयत्न करुन स्पर्धा, चर्चासत्रे, प्रशिक्षण, तालुकास्तरावर बैठका, शालांतर्गत क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी खेळाच्या क्षेत्रातून विद्यार्थी शारिरीकदृष्ट्या कसा सुदृढ होईल यासाठी सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मयुर ठाकरे तर आभार जितेंद्र पगारे यांनी मानले.