नवी दिल्ली । एकीकडे महाराष्ट्रात उन्हाचे चटके सुरु होत असतानाच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर देखील सुरु झाले आहेत. मात्र दुसरीकडे आयपीएलमध्ये खेळाडूंच्या पिण्याच्या पाण्यावर लाखो रुपए खर्च केले जात आहेत.
विराट कोहली ’एव्हिअन’ मिनरल वॉटर ब्रॅण्डचे पाणी पितो. फ्रान्सहून त्याच्यासाठी हे पाणी मागवले जाते. या ब्रॅण्डच्या एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 600 रुपये आहे. विराट कोहलीप्रमाणे अनेक सेलिब्रेटी आहेत जे एक लिटर पाण्यासाठी 36 हजार रुपयांपर्यंत खर्च करत असल्याचे माहिती मिळाली आहे.